25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeराष्ट्रीयगोध्राकांडातील आरोपीला २० वर्षांनंतर जन्मठेप

गोध्राकांडातील आरोपीला २० वर्षांनंतर जन्मठेप

एकमत ऑनलाईन

गोध्रा : २००२ च्या गोध्रा हत्याकांड प्रकरणी गोध्रा न्यायालयाने एका आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या घटनेत ५९ कारसेवकांचा होरपळून मृत्यू झाला होता.

गुजरातमधील पंचमहाल जिल्ह्यातील गोध्रा अतिरिक्त सत्र न्यायाधीशांच्या न्यायालयाने आरोपी रफिक भाटुक याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. भाटुकला फेब्रुवारी २०२१ मध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर या प्रकरणी खटला सुरू झाला.

२७ फेब्रुवारी २०२२ रोजी अयोध्येहून कारसेवकांना घेऊन परतणा-या रेल्वेला आग लावण्याच्या प्रकरणात भाटुकचा सहभाग असल्याचा आरोप आहे. या घटनेत ५९ जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जातीय दंगलीही उसळल्या. यामध्ये १२०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता.

विशेष सरकारी वकील आर. सी. कोडेकर यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, भाटुक हा या प्रकरणातील आतापर्यंतचा ३५ वा आरोपी असून, त्याच्यावर न्यायालयात गुन्हा सिद्ध झाला आहे.

११ जणांना फाशी, २० जणांना जन्मठेप
गेल्या वर्षी पंचमहाल पोलिसांनी विशेष कारवाई करून गोध्रा शहरातील एका भागातून भाटुकला ताब्यात घेतले होते. आरोप सिद्ध झाल्यानंतर तो फरार झाला होता, त्या काळात तो अनेक शहरांमध्ये राहत होता. विशेष एसआयटी न्यायालयाने यापूर्वी १ मार्च २०११ रोजी या प्रकरणात ३१ जणांना दोषी ठरवलं होतं, त्यापैकी ११ जणांना फाशीची तर २० जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या