मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजार आणि भारतीय बाजारात आज म्हणजेच, रविवार १८ डिसेंबर रोजी सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ऐन लग्नसराईच्या मुहूर्तावर ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागतोय.
गेल्या काही वर्षांपासून महागाई मोजण्यासाठी सोन्याच्या किंमती हे एक मानक आहे असं आपण मानतो.
सोन्यामध्ये गुंतवणूक करणे ही महत्वाची गुंतवणूक समजली जाते. कारण त्यातून चांगला परतावा मिळतो.
आज २२ कॅरेटचा १० ग्रॅम सोन्याचा दर ५०,१०० तर २४ कॅरेटचा ५४,६४० रुपये आहे तर १० ग्रॅम चांदीचा दर ६९० रुपये आहे.