22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeराष्ट्रीयआता ६५ हजारांवर जाणार सोन्याचा दर?

आता ६५ हजारांवर जाणार सोन्याचा दर?

एकमत ऑनलाईन

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किमती रोज वाढत आहेत. शुक्रवारी मुंबईत सोन्याचा दर १० ग्रॅमसाठी ५० हजार ९१९ या विक्रमी स्तरावर होता, तर देशाची राजधानी नवी दिल्लीत १० ग्रॅमचा दर ५१ हजार ९४६ इतका होता.

कोरोना व्हायरसमुळे भारत आणि जागतिक अर्थव्यवस्थेत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे सोन्याच्या किमती वाढत आहेत. या वाढणाºया किमतींमुळे एक मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. सोन्याच्या वाढत्या दरामुळे सराफा बाजाराचे असे म्हणणे आहे की, अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे ग्राहकांकडून सोन्याची मागणी कमी होण्याचा धोका आहे.

अखिल भारतीय रत्न आणि आभूषण परिषदेचे चेअरमन अनंत पद्मनाभन यांनी मागणी पहिल्यापेक्षा कमी आहे. मात्र, जागतिक बाजारपेठेत सोन्याचा दर १ हजार ९०० डॉलरवर पोहोचला असून हा गेल्या ९ वर्षातील विक्रमी स्तर आहे. त्यामुळे दर वाढत असल्याचे म्हटले.

Read More  तिरुका येथील १३ जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या