26.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयकोलकाता रस्त्यावर ५५ कोटींचे सोने जप्त

कोलकाता रस्त्यावर ५५ कोटींचे सोने जप्त

एकमत ऑनलाईन

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये सोन्याच्या तस्करीचे प्रकरण सातत्याने समोर येत आहेत. आता कोलकात्याच्या रस्त्यावर ५५ कोटी रुपयांचे सोने सापडले आहे. बेलघरिया एक्स्प्रेस वेवर एका मारुती अल्टो कारमध्ये सुमारे ११ किलो सोने नेले जात होते. शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास ही कार रस्त्यावर संशयास्पदरित्या पार्क केलेली आढळून आली. बेलघरिया पोलिसांनी कारची झडती घेत सोने जप्त केले.

याप्रकरणी पोलिसांनी कार चालकासह चौघांना अटक केली आहे. डीसी अजय प्रसाद यांनी सांगितले की, अटक केलेल्या लोकांकडे सोने कुठून आले आणि ते कोठून नेले जात होते याची चौकशी केली जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांना याची आधीच माहिती होती. त्यामुळे त्या भागातील पोलिस आधीच सतर्क झाले होते. शुक्रवारी सकाळी बॅरकपूरजवळ उभी असलेली कार पाहून पोलिसांना संशय आला. त्यानंतर कारची झडती घेतली असता ११ किलो सोने जप्त करण्यात आले.

पोलिसांनी सांगितले की, मारुती कारमधील एका बॅगेत अनेक सोन्याचे बार होते. प्राथमिक तपासानंतर कार बीटी रोडने मेदिनीपूरच्या दिशेने जात असल्याचा अंदाज त्यांनी लावला. प्राथमिक तपासात गाडीची नंबर प्लेट पश्चिम बंगालची असल्याचे निष्पन्न झाले. मारुती अल्टो कारमधून सुमारे ११ किलो सोने जप्त करण्यात आले आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या