24 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयनिफ्टीला अच्छे दिन

निफ्टीला अच्छे दिन

एकमत ऑनलाईन

मुंबई : भारतीय शेअर बाजारातील नॅशनल स्टॉक्स एक्स्चेंजच्या निर्देशांकाला अर्थात निफ्टीला ५ महिन्यांनंतर अच्छे दिन पाहायला मिळाले आहेत. कारण निफ्टी ४ एप्रिलनंतर पहिल्यांदाच ५ महिन्यांनी १८,००० पॉईंट्सवर बंद झाला. तेल, वायू आणि आयटी क्षेत्रातील समभागांमध्ये वाढ झाल्याने हा परिणाम पाहायला मिळाला. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठांमध्ये बड्या गुंतवणुकदारांनी खरेदीचा धडाका लावला. गेल्या आठवड्यात प्रमुख मध्यवर्ती बँकांमध्ये चलनवाढीचा सामना करावा लागला होता. पण त्यानंतर आजचा दिवस गुंतवणूकदारांसाठी दिलासादायक ठरला.

निफ्टीमधील ३४ शेअर्स दिवसभरात वधारले. यामध्ये बजाज फिनसर्व्ह, टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स, इंडसइंड बँक, ब्रिटानिया आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी सर्वाधिक नफा मिळवला, तर एचडीएफसी बँक, रिलायन्स, एचडीएफसी, बजाज फिनसर्व्ह आणि भारती एअरटेल यांनी दोन्ही मुख्य निर्देशांकांत वाढ नोंदवली. तसेच टायटन, लार्सन अँड टुब्रो, बजाज फायनान्स, एचडीएफसी बँक आणि अदानी पोर्ट्सच्या शेअर्समध्ये प्रत्येकी १.५ टक्क्यांच्या आसपास वाढ नोंदवली. दुसरीकडे श्री सिमेंट, सिप्ला, आयशर मोटर्स, डिवीज लॅब्स, भारत पेट्रोलियम, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांचे शेअर्स ०.३ टक्के ते ०.९ टक्क्यांदरम्यान घसरले.

लवकरच नवा विक्रम
जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य गुंतवणूक रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार म्हणाले की, सध्या सुरू असलेली बाजारातील तेजी मुख्यत्वे एफआयआय धोरणात अचानक झालेल्या बदलामुळे झाली आहे. किरकोळ गुंतवणूकदार आणि मजबूत अर्थव्यवस्थेकडून बाजाराला मिळणारा पाठिंबा यामुळेही बाजार वधारण्यास फायदा झाला. हे चांगले लक्षण असल्याने लवकरच निर्देशांक विक्रम नोंदवू शकतो.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या