36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयज्या दिवशी इंधनदरवाढ नाही तो ‘अच्छा दिन’

ज्या दिवशी इंधनदरवाढ नाही तो ‘अच्छा दिन’

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात सातत्याने सुरू असलेल्या इंधन दर वाढीच्या मुद्यांवरून काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मोदी सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. भाजपा सरकारला आठवड्यातील त्या दिवसाचे नाव ‘अच्छा दिन’ करायला हवे ज्या दिवशी डिझेल-पेट्रोलच्या दरात वाढ होणार नाही. कारण वाढत्या महागाईच्या काळात अन्य दिवस तर सर्वसामान्यांसाठी ‘महंगे दिन’ आहेत. असे प्रियंका गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देखील इंधन दर वाढीवरून मोदी सरकारवर टीका केलेली आहे. त्यांनी महागाईच्या संबंधातील सर्व हेडलाइन्सचा एक फोटो शेअर करत, महागाईचा विकास असे ट्विट केले आहे. तर, रॉबर्ट वढेरा यांनी देखील ट्विट करत हे जाहीर केले आहे की, जोपर्यंत इंधन दर कमी होत नाही तोपर्यंत ते आपल्या कार्यालयात सायकलने जातील.

महागाईचा विकास : राहुल गांधी
जून २०१४ मध्ये भाजपचे सरकार आले, तेव्हा कच्च्या तेलाच्या किंमती ९३ डॉलर प्रतिबॅरल होत्या. तेव्हा पेट्रोल ७१ तर डिझेल ५७ रुपये प्रतिलिटर होते. गेल्या ७ वर्षांत कच्चे तेल ३० डॉलरने स्वस्त झाले आहे़ पण तरीही पेट्रोल सेंच्युरी करतेय आणि डिझेल त्याच्या पाठपाठ जाते’, असे राहुल गांधी यांनी ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले होते़ २०२१मध्ये १९ वेळा ही दरवाढ झाली आहे. १५ फेब्रुवारी २०२० ते १५ फेब्रुवारी २०२१ या काळात पेट्रोल १७.०५ तर डिझेल १४.५८ रुपयांनी महाग झाले आहे, अशी आकडेवारी देखील त्यांनी सादर केली होती.

महागाईची जनतेला सवय होईल : बिहार मंत्र्याचे वक्तव्य
बिहारचे पर्यटन मंत्री नारायण प्रसाद यांनी पेट्रोल-डिझेलची दरवाढ आणि वाढती महागाई यासंदर्भात वादग्रस्त वक्तव्य केले आहे. नारायण प्रसाद यांनी केलेल्या विधानानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. महागाईचा सामान्य जनतेवर विशेष परिणाम होत नाही. महागाईमुळे जनता त्रस्त झालेली नाही. याची लोकांना आता सवय झाली आहे. असा दावा नारायण प्रसाद यांनी यावेळी बोलताना केला.

लोकशाहीत अभिव्यक्ती स्वातंत्र्य असायलाच हवे; दिशाच्या समर्थनार्थ ग्रेटा थनबर्गचे ट्विट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या