24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयकाँग्रेस आमदाराचा पक्षाला रामराम

काँग्रेस आमदाराचा पक्षाला रामराम

एकमत ऑनलाईन

दिसपूर : ज्योतिरादित्य सिंधिया आणि जितिन प्रसाद यांच्यानंतर आता अजून एका तरुण काँग्रेस नेत्याने पक्षाला रामराम ठोकला आहे. विशेष म्हणजे, पुन्हा एकदा काँग्रेसमधल्या कार्यपद्धतीवर आणि पार्टी हायकमांडवर टीका करत हा नेता बाहेर पडल्यामुळे काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काँग्रेसचे आसाममधील आमदार रूपज्योती कुर्मी यांनी हायकमांडवर टीका करत पक्षातील सर्व पदांचा आणि आमदारकीचा देखील राजीनामा दिला आहे.

रुपज्योती कुर्मी २१ जून रोजी भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने चिंतन करण्यची गरज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. रुपज्योती कुर्मी यांनी पक्ष सोडण्याचे कारण देखील स्पष्ट केले आहे. मी काँग्रेस सोडतोय कारण पार्टी हायकमांड आणि गुवाहाटीमधले नेते फक्त ज्येष्ठ नेत्यांनाच प्राधान्य देतात. आम्ही त्यांना सांगितले होते की काँग्रेसला यंदा निवडणूक जिंकण्याची पूर्ण संधी आहे. आपण एआययूडीएफसोबत आघाडी करायला नको. ती चूक ठरेल. आणि ती चूक ठरली, असे कुर्मी यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या नेतृत्वात पक्षाची अधोगती
काँग्रेस पक्षाच्या तरुण नेत्यांचे म्हणणे ऐकत नाही. म्हणून काँग्रेसची सर्व राज्यांमध्ये वाईट अवस्था झाली आहे. राहुल गांधी पक्षाचे नेतृत्व करू शकत नाहीयेत. जर ते केंद्रस्थानी असतील, तर पक्ष पुढे जाऊ शकत नाही, असेदेखील रुपज्योती कुर्मी म्हणाले आहेत.

आमदारकीचा राजीनामा आणि निलंबनाची कारवाई
रुपज्योती कुर्मी यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियांनतर आणि पक्ष सोडण्याची भूमिका घेतल्यानंतर पक्षाकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. रुपज्योती कुर्मी यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर त्यांच्यावर पक्षविरोधी कारवायांसाठी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. रुपज्योची कुर्मी हे आसामच्या जोरहाट जिल्ह्यातल्या मरियानी मतदारसंघातून निवडून आले आहेत.

तरुणांना प्रशिक्षित करण्यासाठी ‘क्रॅश कोर्स’चे उद्घाटन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या