32.3 C
Latur
Sunday, April 11, 2021
Homeराष्ट्रीयग्रामीण महिलांना उद्योजक घडवण्यासाठी गुगलचा पुढाकार

ग्रामीण महिलांना उद्योजक घडवण्यासाठी गुगलचा पुढाकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त गुगल फॉर इंडिया इव्हेंटच्या व्हर्च्युअल आवृत्तीत महिला उद्योजकांना पाठबळ देण्याच्या योजनेची गूगलने सोमवार दि़ ८ मार्च रोजी घोषणा केली. गुगलने बिहार, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेश या सहा राज्यांत डिजिटल आणि आर्थिक साक्षरता प्रशिक्षण देण्यासाठी नॅसकॉम फाउंडेशनला ५ लाख डॉलर्सचे अनुदान दिले. या कार्यक्रमा अंतर्गत १ लक्ष महिला कृषि कामगारांना पाठबळ देण्यात येण्याचा विचार आहे.

ग्रामीण महिला उद्योजकांना समुदाय सहाय्य, मार्गदर्शनासाठी आणि इतर कार्यक्रमांचे मार्गदर्शन देणारे वुमन विल वेब प्लॅटफॉर्म सुरू करण्याची घोषणाही या समितीने केली आहे. गुगलने म्हटले आहे की, महिला उद्योजकांच्या कल्पनांना व्यवसायात बदलण्यात मदत करण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी हे प्लॅटफॉर्म काम करणार आहे.

त्यात म्हटले आहे की गुगल.ऑर्ग भारत आणि जगभरातील सामाजिक संस्थांना एकूण २५ दशलक्ष डॉलर्सची तरतूद करेल जी महिला व मुलींच्या आर्थिक सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी मदत करेल. महिला दिनाच्या निम्मित्ताने गुगल पेने बिझिनेस पेजेस लॉन्च करण्याची घोषणा केली जी होमप्रेयर्सना त्यांची उत्पादने आणि सेवांची सोपे कॅटलॉग तयार करण्यास सक्षम करेल आणि एका विशिष्ट यूआरएलद्वारे लोकांना त्यांच्यापर्यंत पोहोचवेल.

 

आज राज्याचे बजेट; आर्थिक संकटात संतुलन राखण्याचे अर्थमंत्र्यांसमोर आव्हान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,473FansLike
162FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या