27.4 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयस्वातंत्र्य दिनानिमित्त गूगलचे स्पेशल डूडल

स्वातंत्र्य दिनानिमित्त गूगलचे स्पेशल डूडल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण करण्याच्या आनंदात सगळीकडे अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर सर्च इंजिन गुगल कंपनी स्पेशल डूडल बनवत भारताच्या स्वातंत्र्य दिवसाचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या डूडलला केरळच्या नितीने बनवले. त्यात पंतंगींना आकाशात उडताना दाखवल्या गेले आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारत कसा विकासाच्या शिखरावर पोहोचला आहे हे या डूडलमधून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

भारताच्या खास स्वातंत्र्यदिनी केरळच्या कलाकार नितीने डूडल बनवले आहे. पतंग उडवणे हा भारतीय संस्कृतीचा भाग आहे. त्यामुळे डूडलच्या माध्यमातून भारतीय संस्कृती प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. याव्यतिरिक्त ते विश्वासाचे प्रतिक आहे. जीआयएफ अ‍ॅनिमेशनमुळे आणखी आकर्षक दिसत आहे.

स्वातंत्र्याच्या लढाईतही पंतंगीची भूमिका महत्वाची
स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी स्वतंत्र सेनानी पंतंगीवर नारे लिहून आकाशात उडवत त्यांचा विरोध प्रदर्शित करत होते. तेव्हापासून स्वतंत्रता दिवसच नाही तर इतर आनंदाच्या दिवशीही पतंग उडवत लोक त्यांचा आनंद व्यक्त करतात.

स्वातंत्र्यदिनी स्वतंत्र सेनानी आणि क्रांतिकारकांची करतात आठवण
आजपासून ७५ वर्षांपूर्वी १५ ऑगस्ट या दिवशी भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. यासाठी महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आणि अनेक क्रांतिकारकांनी आणि स्वतंत्र सेनानींनी त्यांचं सगळंकाही देशासाठी समर्पित केलं होतं. त्यामुळे या दिवशी देशातील महान क्रांतिकारकांची आठवण केली जाते.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या