हैदराबाद : हुंड्यात जुने फर्निचर देण्यात आल्यामुळे नवरदेवाने लग्न मोडल्याची संतापजनक घटना हैदराबादेत घडली आहे. बस चालक असणा-या मोहम्मद झकीर याचे १९ फेब्रुवारी रोजी होणार होते. पण त्याने वरातच आणली नाही.
वधूचे वडील त्याच्या घरी गेले असता झकीरने सांगितले की, त्यांना लग्नात जुने फर्निचर देण्यात आले. त्यामुळे त्याने लग्न मोडले आहे. यावेळी वधूच्या वडिलांना शिवीगाळ करण्यात आली, असा आरोप आहे. मौला अलीमध्ये स्कूल बस चालक असणा-या २५ वर्षीय झकीरचे लग्न हीना फातिमासोबत ठरले होते. हे दोघांचेही दुसरे लग्न होते. हीना बंदलागुडाच्या रहमत कॉलनीत राहते. रविवारी दोघांचे लग्न जवळच्याच एका मस्जिदीत होणार होते. त्याची संपूर्ण तयारी झाली होती. पाहुणेही आले होते. स्वयंपाकही तयार झाला होता.