36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयकेंद्रीय कर्मचा-यांसाठी सरकारची उत्सव योजना

केंद्रीय कर्मचा-यांसाठी सरकारची उत्सव योजना

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवार दि़ १२ ऑक्टोबर रोजी सरकारकडून करण्यात येणा-या उपाययोजनांची माहिती दिली असून, यात केंद्र सरकारने चार योजना जाहीर केल्या आहेत़ त्यात उत्सवांसाठी केंद्रीय कर्मचा-यांना १० हजार रुपये ऍडव्हान्स देण्याची घोषणा केली आहे.

अर्थव्यवस्थेला पुन्हा एकदा रुळावर आणण्यासाठी वस्तूंना मागणी वाढणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने केंद्र सरकारने महत्वाच्या निर्णयांची घोषणा केली. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पत्रकार परिषदेत याची माहिती दिली. केंद्र सरकारने खरेदीशक्ती वाढवण्यासाठी चार पावले उचलली आहेत. यात पहिले पाऊल म्हणजे केंद्रीय कर्मचा-यांना एलटीसीच्याऐवजी कॅश व्हाऊचर्स दिली जाणार आहेत. दुसरी गोष्ट कर्मचा-यांना सण उत्सवांसाठी १० हजार रुपये ऍडव्हान्स दिले जाणार आहेत. कर्मचारी ही रक्कम १० हफ्त्यांमध्ये जमा करू शकणार आहेत. मार्च २०२१ पर्यंतच ही योजना लागू असणार आहे.

राज्यांना ५० वर्षांसाठी बिनव्याजी कर्ज
राज्यांना ५० वर्षांपर्यंत १२ हजार कोटींचे बिनव्याजी कर्ज दिले जाणार. अर्थसंकल्पातील खर्चाव्यतिरिक्त पायाभूत विकासावर २५ हजार कोटी अतिरिक्त खर्च करण्यात येणार आहे. भांडवल वाढवण्याचा अर्थव्यवस्थेवर अनेक पटींनी परिणाम होतो. याचा चालू काळातील जीडीपीवरच नाही, तर भविष्यातील जीडीपीवरही परिणाम दिसून येतो.

नळदुर्ग परिसरात परतीच्या पावसाने पिकाचे नुकसान

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या