19.8 C
Latur
Monday, December 5, 2022
Homeराष्ट्रीयकर्नाटक सरकार : प्लाझ्मा दात्याला ५००० रुपये देणार

कर्नाटक सरकार : प्लाझ्मा दात्याला ५००० रुपये देणार

एकमत ऑनलाईन

कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामधून काढला जातो प्लाझ्मा : भितीपोटी बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेच करण्यासाठी पुढे येत नसल्याचं चित्र

कर्नाटक : कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना प्लाझ्मा थेरेपी  रुग्णांमधले कोरोनाचे विषाणू नियंत्रणात आणण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचं अनेक प्रकरणांमध्ये दिसून आलं आहे.

अधिकाधिक दाते पुढे येतील, अशी अपेक्षा

या पार्श्वभूमीवर प्लाझ्मा थेरेपीचा देशभरात मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे. मात्र, यासाठी प्लाझ्मा डोनेट करणाऱ्यांची उणीव सध्या भासत आहे. कोरोनावर मात केलेल्या रुग्णांच्या रक्तामधून प्लाझ्मा काढला जातो. मात्र, पुन्हा कोरोनाची (लागण होण्याच्या भितीपोटी बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा डोनेच करण्यासाठी पुढे येत नसल्याचं चित्र आहे. या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारने अनोखी शक्कल लढवली आहे. कोरोनातून बऱ्या झालेल्या रुग्णांना प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी कर्नाटक सरकारने ५ हजार रुपये देण्याचं जाहीर केलं आहे. यातून प्लाझ्मा डोनेट करण्यासाठी अधिकाधिक दाते पुढे येतील, अशी अपेक्षा कर्नाटक सरकारला आहे.

Read More  वल्लाह हबीबी!!! मृत व्यक्ती जिवंत

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या