नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैनिकांमधील संघर्ष सध्या खूप चर्चेत आहे. चीनच्या मुद्यावर विरोधक सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच सरकार चीनच्या मुद्दावर उघडपणे चर्चा करत नसल्याचा आरोपही करÞण्यात येतो. त्यातच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला कडक शब्दांत जाब विचारला आहे.
केजरीवाल म्हणाले की, गेल्या काही वर्षात चीन आपल्याकडे डोळे वाटारत आहे. सातत्याने लहानमोठे हल्ले करत आहे. सीमेवरील आपले सैनिक त्यांच्याशी खंबीरपणे लढत आहेत आणि जीवही देत आहेत. मात्र भारत सरकार म्हणते की, सर्वकाही ठिक आहे. तेही चीन आपल्या सीमेत घुसलेले असताना. दरम्यान माध्यमांमधून आलेल्या बातम्यातून कळते की, सरकार चुकीचे दावे करत आहे.
एकीकडे चीन आपल्याला डोळे दाखवत आहे, आपले सैनिक त्यांविरोधात कठोर लढा देत आहेत आणि आपला जीव देत आहेत. मात्र सरकार चीनला यासाठी बक्षीस देत आहोत. त्यांना शिक्षा देण्याऐवजी भाजप सरकारचे काय सुरू आहे हे कळत नाही, असही केजरीवाल म्हणाले.