32.6 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeराष्ट्रीयराज्यपाल कोश्यारी सर्वाेच्च न्यायालयात

राज्यपाल कोश्यारी सर्वाेच्च न्यायालयात

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : उत्तराखंड हायकोर्टाने दिलेल्या नोटीसवर महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उत्तराखंड हायकोर्टाने कोश्यारींना एका याचिकेसंदर्भात नोटीस बजावली होती. माजी मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या सरकारी बंगल्याचे भाडं न भरल्याबद्दल त्यांच्याविरूद्ध कोर्टाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करावी, अशी मागणी याचिकेत केली आहे.

कोश्यारी यांनी हायकोर्टाच्या आदेशाला स्थगिती देण्याची विनंती याचिकेतून केलीय. आपण सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल आहोत आणि राज्यघटनेतील अनुच्छेद ३६१ नुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांवर कारवाई करता येत नाही, असा दावा कोश्यारी यांनी केला आहे. बाजारभाव कोणत्याही तर्काशिवाय निश्चित केला गेला आहे आणि तो देहरादून येथील रहिवासी परिसरासाठी खूप जास्त आहे. यासह याप्रकरणी आपल्या बाजू मांडण्याची संधी न देताच निर्णय घ्यायला नको होता, असे कोश्यारींचे म्हणणे आहे़

माजी मुख्यमंत्री चव्हाण यांना आयकरची नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या