22.1 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeराष्ट्रीयमध्य प्रदेशात धान्य घोटाळा?

मध्य प्रदेशात धान्य घोटाळा?

एकमत ऑनलाईन

भोपाळ : मध्ये प्रदेशमध्ये महिला बाल कल्यान विभागामधून वेगवेगळ्या जिल्हात राहणा-या ३ वर्षांच्या मुलांना, गर्भवती महिलांना, स्तनपान करणा-या मातांसाठी आणि शाळेत ११ ते १४ वर्षाखालील मुलांना रेशनचे वाटप केले आहे. टेक होम पूरक पोषण आहारांतर्गत रेशनचे वितरण करत आहे. मध्य प्रदेशच्या महालेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालात ही बाब उघड झाली आहे. या खात्याचे मंत्री सध्या मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान आहे.

दरम्यान विभागाने २०१८-२१ या काळात सुमारे २३९३ करोडचे ४.०५ मेट्रिक टन रेशन साधारणपणे १.३५ करोड लाभार्थांना वाटप केले. पण टेक होम रेशनच्या अहवालातून खुलासा झाला आहे की परिवहन, उत्पादन, वितरन आणि रेशनची गुणवत्ता या सगळ्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला आहे. ह्या योजने अंतर्गत वितरीत होणारे रेशन हे फक्त कागदावरच वाटले आहे.

महालेखा परीक्षकांच्या लेखापरीक्षण अहवालात असे म्हटले आहे की, सुमारे ६.९४ कोटी किमतीच्या ६ रेशन उत्पादक कंपन्यांकडून ११२५.६४ मेट्रिक टन रेशनची वाहतूक करणा-या दुचाकी, कार, रिक्षा आणि टँकरची संख्या दाखवण्यात आली आहे. यासोबतच टेक होम रेशनच्या उत्पादन आणि वितरणाच्या नोंदीमध्येही भ्रष्टाचार समोर आला आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या