नियमांत होणार बदल?, केंद्र सरकारचा विचार सुरू
नवी दिल्ली : एकाच नोकरीत पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ काम केल्यासच सध्या ग्रॅच्युईटीचा फायदा कर्मचाºयांंना मिळतो. मात्र, सरकार आता या नियमांत बदल करण्याच्या विचारात आहे. या नव्या नियमानुसार पाच वर्षांपेक्षा कमी काळ नोकरी झाल्यासही ग्रॅच्युईटी मिळू शकणार आहे.
सरकारी अधिकाºयांच्या माहितीनुसार असुरक्षितता आणि अन्य कारणांमुळे लोक कायम नोकºया बदलत राहतात. त्यामुळे ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांचा नियम व्यावहारिक म्हणता येणार नाही. त्यातच अनेक वर्षांपासून ग्रॅच्युईटीचा नियम बदलण्याची मागणी होत आहे. यावर सरकारने आता विचार सुरू केला आहे. संसदेच्या स्थायी समितीनेदेखील ग्रॅच्युईटीची मर्यादा कमी करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. नव्याने तयार होत असलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्यामध्ये याचा समावेश केला जाऊ शकतो.
लेबर मार्केटच्या तज्ज्ञांनुसार ग्रॅच्युईटीसाठी पाच वर्षांची मर्यादा खूपच अधिक आहे. त्यामुळे कर्मचाºयांचें हित पूर्ण केले जाऊ शकत नाही.दरम्यान, दीर्घकाळ कामाच्या पद्धतीला प्रोत्साहन दिले जावे, याकरिता ग्रॅच्युईटीसाठी ५ वर्षांची मर्यादा निश्चित करण्यात आली होती. मात्र, आता विविध नोक-यांचे पर्याय खुले झाले आहेत. त्याचबरोबर नोक-यांमधील असुरक्षिततादेखील वाढत आहे. त्यामुळे याबाबत आग्रह धरला जात आहे. कर्मचारी जितकी वर्षे एकाच संस्थेत काम करतो, तितक्या वर्षांसाठी प्रत्येक महिन्यातील १५ दिवसांचा पगार त्यांला ग्रॅच्युईटी म्हणून दिला जातो.
लातूर : जिल्ह्यात आणखी २२८ रुग्णांची भर