नवी दिल्ली : चीन व पाकिस्तानच्या वाढत्या कुरापतींना प्रत्युत्तर देण्यासाठी हवाई दलाची भुमिका महत्त्वची असणार आहे. त्यापार्श्चभुमीवर केंद्र सरकारच्या संरक्षण विषयक समितीने बुधवारी ८३ तेजस विमानांच्या खरेदीला हिरवा कंदील दाखवला. तब्बल ४८ हजार कोटी रुपयांची ही खरेदी होणार असून भारतीय हवाई दलाची ताकद वाढणार आहे.
संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी ही माहिती दिली. तेजस मार्क १ ए या लढाऊ विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार असून काही वर्षांमध्ये हवाई दलाच्या सामर्थ्याचा प्रमुख घटक ते ठरेल, असा विश्वास सिंह यांनी व्यक्त के ला.
हवाईदलाला अनेक लढाऊ विमानांची गरज
तेजस या लढाऊ विमानांची निर्मिती स्वदेशी कंपनी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडने केली आहे. मिग २१ या रशियन बनावटीच्या विमानांचा कार्यकाल संपत आल्याने हवाईदलाला नवीन लढाऊ विमानांची गरज पडत होती. त्यादृष्टिकोनातून काही वर्षांपुर्वी तेजस मार्क १ या विमानांचा समावेश हवाई दलात केला होता. मात्र विमानांची संहारकता अधिक चांगली व्हावी, यासाठी हवाई दलाने काही गरजांची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यानूसार तेजस मार्क १ पेक्षा तेजस मार्क १ ए या विमानात तब्बल ५० सुधारणा व अद्ययावतता करण्यात आल्या आहेत.
६० टक्क्यांपर्यंत स्वदेशी तंत्रज्ञान
तेजस मार्क १ ए ही विमाने देशाच्या दोन्ही सीमांवर घुसखोरी करु पाहणा-या शत्रुंना हवाई हल्ल्यांतून भाजून काढण्यासाठी अधिक संहारक झाली आहेत. विमानांच्या निर्मितीत ६० टक्के इतके स्वदेशी तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे.
तेजस मार्क १ ए ची काही वैशिष्ट्ये
-सिंगल इंजिन, कंपाऊंड डेल्टा विंग
– आवाजाच्या वेगाने कार्यरत
– अनेक प्रकारच्या मोहिमांसाठी उपयुक्त
– जगातील सर्वात लहान आकाराचे विमान असल्याने हवेत चपळपणे काम करण्यास सक्षम
– रचना व वापरलेल्या साहित्यामुळे शत्रुच्या रडारला काही प्रमाणात चकवण्यास सक्षम
कर्नाटकात पैसे घेऊन मंत्रिपदांचे वाटप