24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयदिल्ली अनलॉकला हिरवा कंदील

दिल्ली अनलॉकला हिरवा कंदील

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुस-या लाटेचा जोर ओसरत असल्याने राज्यांनी आता अनलॉकच्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रानंतर आता दिल्लीतही लॉकडाउनमधील काही नियमांत शिथिलता आणण्यात आली आहे. कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे दिल्लीत लॉकडाउन लावण्यात आला होता. सहावेळा लॉकडाऊनचा अवधी वाढवण्यात आला होता. मात्र सातव्यांदा लॉकडाऊनचा अवधी वाढवत असताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काही नियमांमध्ये शिथिलता आणली आहे.

दिल्लीत सम-विषम फॉर्म्युल्याने बाजार सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर मेट्रो ट्रेन सुरु करण्यासही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे. दिल्लीत १४ जूनपर्यंत लॉकडाउन असला तरी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दिल्लीत सम विषम या योजनेनुसार दुकाने सुरु करण्याची परवानगी दिली आहे.

गुजरातमध्ये १५ जूनपासून ‘लव्ह जिहाद’ कायदा

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या