21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeराष्ट्रीयबारामूलामध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला

बारामूलामध्ये सीआरपीएफ जवानांवर ग्रेनेड हल्ला

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बारामूलामध्ये सुरक्षा दलावर दहशतवाद्यांना ग्रेनेडने हल्ला केला़ या हल्ल्यात सीआरपीएफचे तीन जवान आणि एक सामान्य नागरिक जखमी झाले आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात सुरक्षा दलाने सर्च ऑपरेशन सुरू केले आहे.

दरम्यान, गुरुवारी सांबा जिल्ह्यातील विविध ठिकाणी संशयित पाकिस्तानी ड्रोन फिरताना दिसले. अधिका-यांनी सांगितल्यानुसार, रात्री आठ वाजेच्या सुमारास बारी-ब्राह्मण, चिलाद्या आणि गगवाल परिसरात एकाच वेळी ड्रोन दिसले. यापूर्वीच सुरक्षा दलाने एका ड्रोनला पाडून त्यावर लावलेले ५ किलो आयईडी जप्त केले आहे.

पोलिस कॉन्स्टेबलची एके-४७ रायफल हिसकावली
रविवारी कुलगामच्या खुदवानी परिसरात दहशतवाद्यांनी पोलिस कॉन्स्टेबलकडून एके-४७ रायफल हिसकाऊन घेतल्याची घटना घडली. तर, मुनंद परिसरात सुरक्षा दलाने चकमकीत एका दहशतवाद्याला ठार केले. त्यापूर्वी, शनिवारीही सकाळी बांदीपोरामध्ये सुरक्षा दलाने चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार केले.

शरद पवार-नितीन गडकरींची दिल्लीत भेट

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या