26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeराष्ट्रीयपेट्रोल डिझेल दरवाढीचा हाहाकार

पेट्रोल डिझेल दरवाढीचा हाहाकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्­ली : सार्वजनिक क्षेत्रातील तेल कंपन्यांनी इंधन दरात शुक्रवार दि़ ११ जून रोजी वाढ केली. ताज्या दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल दराने १०२ रुपयांची पातळी ओलांडली आहे. जागतिक बाजारपेठेत क्रूड तेलाचे दर ७२ डॉलर्स प्रती बॅरलपर्यंत पोहोचल्याच्या पार्श्वभूमीवर इंधन दरात २८ ते २९ पैशांची वाढ झाली आहे.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचे लीटरचे दर ९५.८५ रुपयांवर गेले असून, डिझेलचे दर ८६.७५ रुपयांवर गेले आहेत. मुंबईत हेच दर क्रमश: १०२.०४ आणि ९४.१५ रुपयांवर गेले आहेत. देशाच्या सर्वच भागात इंधनाचे दर सर्वकालीन उच्चांकी स्तरावर गेले आहेत. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोलने १०५ रुपयांचा तर डिझेलचे ९८ रुपयांचा स्तर ओलांडला आहे.

पेट्रोलियम पदार्थांच्या दरवाढीमुळे आगामी काळात महागाईचा मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. देशातील अन्य महानगरांचा विचार केला तर चेन्नईमध्ये पेट्रोलचे दर ९७.१९ रुपयांवर पोहोचले असून, डिझेलचे दर ९१.४२ रुपयांवर गेले आहेत. प. बंगालमधील कोलकाता येथे हेच दर क्रमश: ९५.८० आणि ८९.६० रुपयांवर गेले आहेत.

लसीकरणात महाराष्ट्र अव्वल

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या