मधुबनी : बाजार ही संकल्पना तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. एका ठिकाणी नवरदेवाचांही बाजार भरतो. बिहारच्या मिथीलांचल भागातील मधुबनी गावात नवरदेवांचाही एक बाजार भरतो.
या मधुबनी जिल्ह्यात ‘सौराठ सभा’ म्हणजेच नवरदेवांचा बाजार भरतो.
जवळपास १३ एकर जमिनीवर हा बाजार भरवला जातो आणि हा बाजार ९ दिवसांपर्यंत चालतो. या बाजारात लांब लांब ठिकाणांहून वर-वधू येतात. या विवाहाला स्थानिक भाषेत ‘सभागाछी’ नावानेही ओळखतात. या बाजारात आपल्या लाडक्या लेकीसाठी बाप उत्तम वराची निवड करण्यासाठी येतात. या लग्नाच्या बाजारात नवरदेव पारंपरिक धोती-कुर्ता आणि पगडी परिधान करुन येतात नंतर वर-वधुची पसंती होऊन नोंदणीकाराकडून दस्तावेज लिहुन घेतला जातो.
येथे नवरदेवाच्या योग्यतेनुसार किंमतीही लावल्या जातात म्हणजे सौदेबाजी येथे सर्रास चालते. येथे खास करुन ब्राम्हण समुदायातील संबंधित लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. याशिवाय या ठिकाणी वर-वधूचे कूळ, गोत्र कुंडली आणि राशीही पाहिली जाते.
या वर्षी ३० जूनपासून हा बाजार भरला आहे. या बाजारात सहभागी होण्यासाठी रजिस्ट्रेशन महत्त्वाचे असते. जे स्थळ पसंत पडते, त्याला रजिस्ट्रेशन करणारेच मान्यता देतात. या पुरातन काळापासून चालत आलेल्या नोंदणी पद्धतीमध्ये वडिलांच्या आणि आजोळच्या ९ पिढ्यांचे संबंध पाहिले जातात. यात कोणत्याही प्रकारचे संबंध आढळल्यास लग्नाला परवानगी मिळत नाही. म्हणजेच काय तर रक्तांच्या नात्यांमध्ये तर लग्न होत नाही ना, हे तपासून पाहिले जाते. याचे वैज्ञानिक कारण ते असे देतात की, वेगळ्या ब्लड ग्रुपमध्ये लग्न केल्याने जन्मणारे बाळ हे सुंदर अन् सुदृढ निघते.
नोंदणीकार सांगतात की, ही परंपरा ७०० वर्षांपासून सुरू आहे. सन १९७१ मध्ये येथे तब्बल १.५ लाख लोक आले होते. मागच्यावेळी १० ते १२ हजार लोक येथे आले होते.ह्याणि या नवरदेवाच्या बाजारात ४५० जोडपांचे विवाह झाले होते.
असा सुरू झाला नवरदेवाचा बाजार
स्थानिकांच्या मते, बहुतांश जुन्या प्रथा-रूढी संपल्या आहेत. हुंड्याची प्रथा नष्ट करण्यासाठी तत्कालीन राजा हरिसिंह देव यांनी या बाजाराची सुरुवात केली होती. तेव्हापासून मग हा बाजार भरतोय आणि या बाजाराची लोकप्रियता अजूनही टिकून आहे हे महत्त्वाचे.