28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयगुजरात बनले ड्रग्जचे सेंटर

गुजरात बनले ड्रग्जचे सेंटर

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी गुजरातमधील अहमदाबादमध्ये लोकांना सभेत संबोधित केले. त्यांनी भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्लाबोल करताना ते म्हणाले, सरदार पटेल हे शेतक-यांचा आवाज होते. त्यांचा सर्वात उंच पुतळा भाजपने उभारला आहे, आणि दुसरीकडे सरदार पटेल ज्या लोकांसाठी लढले त्यांच्या विरोधात केंद्र सरकार कामे करत आहे. राहूल गांधी म्हणाले गुजरातमध्ये काँग्रेस सत्तेवर आल्यास शेतक-यांचे ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू.

भाजपवर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते म्हणाले, गुजरात ड्रग सेंटर बनले आहे. मुंद्रा बंदरातून अमली पदार्थ नेले जातात, मात्र सरकार त्याच्या कोणतीही कारवाई करत नाही. हे गुजरात मॉडेल आहे. गुजरात हे असे राज्य आहे की, जिथे आंदोलन करण्यापूर्वी ज्यांच्या विरोधात आंदोलन करणार आहेत त्यांची परवानगी घ्यावी लागते.

मोफत शिक्षण, विजेचेही आश्वासन
राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यानंतर कोरोना महामारीत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना ४ लाख रुपयांची भरपाई देणार आहे. पुढे म्हणाले आम्ही शेतक-यांना मोफत वीज देऊ आणि सर्वसामान्य ग्राहकांना ३०० युनिट मोफत वीज देऊ. याशिवाय ३००० इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडण्याची आणि मुलींना मोफत शिक्षण देण्याची घोषणाही काँग्रेस नेत्याने केली.

गॅसचे दरही निम्म्यावर आणणार
काँग्रेसची सत्ता येताच १००० रुपयांचा गॅस सिलिंडर ५०० रुपयांना मिळणार असल्याचे ते म्हणाले. भाजप सरकारने बंद केलेल्या शाळा पुन्हा चालू करण्याचे अश्वासन दिले. तसेच काँग्रेस सत्तेवर आल्यास दूध उत्पादकांना ५ रुपये अनुदान देणार,आणि मला गुजरात मधील बेराजगारी संपवायची आहे, त्यामुळे काँग्रेस पक्ष १० लाख तरूणांना रोजगार देण्याचे उदिष्ट आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या