39.1 C
Latur
Wednesday, June 7, 2023
Homeराष्ट्रीयमहागाई भत्त्यात गुजरात सरकारने केली दुप्पट वाढ

महागाई भत्त्यात गुजरात सरकारने केली दुप्पट वाढ

एकमत ऑनलाईन

गांधीनगर : राज्य कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात गुजरात सरकारने ८ टक्के वाढ केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी वाढ केल्याची माहिती दिली.

केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ करताना केंद्रीय कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केली होती. त्यामुळे या कर्मचा-यांना ४२ टक्के डीएचा लाभ दिला जात आहे. ही वाढ १ जानेवारी २०२३ पासून लागू होणार आहे.

किती लाख कर्मचा-यांना होणार फायदा?
राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की याचा फायदा ९.५० लाख पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचा-यांना होणार आहे. या वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे भूपेंद्र पटेल यांनी सांगितले. राज्य सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी दोनदा वाढ केली आहे.

८ टक्के डीए वाढ
महागाई भत्त्यात ८ टक्के वाढ दोन भागात विभागली गेली आहे. पहिली वाढ १ जुलै २०२२ पासून करण्यात आली आणि त्यात ४ टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे १ जानेवारी २०२३ पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दुसरी वाढ करण्यात आली असून त्यातही ४ टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ कर्मचा-यांचा एकूण डीए ८ टक्क्यांनी वाढणार आहे.

राज्यातही डीए वाढ
केंद्र सरकारपाठोपाठ तामिळनाडू सरकारनेही नुकतीच डीए वाढ केली आहे. सातव्या वेतन आयोगाअंतर्गत डीएमध्ये ४ टक्के वाढ करण्यात आली आहे. हिमाचल प्रदेश, राजस्थान, आसाम आणि इतर काही राज्यांमध्ये ३ टक्के महागाई भत्ता वाढवला आहे.

Stay Connected

1,567FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या