लखनऊ : उत्तर प्रदेशातील ज्ञानवापी मशीद प्रकरणाचा खटला आता वाराणसीतील फास्टट्रॅक कोर्टाकडे सोपवण्यात आला आहे. बुधवारी सुनावणीपूर्वी डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी हे प्रकरण डिव्हीजन फास्ट ट्रॅक कोर्ट महेंद्र कुमार पांड्ये यांच्या कोर्टाकडे हस्तांतरीत केलं. पण सध्या न्यायाधीश उपलब्ध नसल्यानं या प्रकरणावर ३० मे रोजी सुनावणी होणार आहे.
ज्ञानवापी मशिदीचा परिसर हिंदू पक्षाला सोपवल्याप्रकरणी आणि वादी पक्षाला ज्ञानवापीमध्ये तात्काळ प्रभावानं पूजापाठ, दर्शनाची परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली होती. मंगळवारी कोर्टानं अधिवक्ता मानबहाद्दूर सिंह आणि अनुष्का त्रिपाठी यांच्यावतीनं मशिदीत शिवलिंग सापडल्यानं तिथं पूजा आणि दर्शन तसेच रागभोग पूजा करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी केली.
याप्रकरणात विश्व वैदिक सनातन संघानं याप्रकरणी तीन मागण्या केल्या आहेत. पहिली मागणी ज्ञानवापी मशीद परिसरात तात्काळ प्राभावानं मुस्लिमांना प्रतिबंध करण्यात यावा, दुसरी मागणी ज्ञानवापीचा संपूर्ण परिसर हिंदूंकडे सोपवण्यात यावा तर तिसरी मागणी म्हणजे तिथं सापडलेल्या शिवलिंगाची पूजा करण्याची परवानगी देण्यात यावी.