24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeराष्ट्रीयभाजपसमोर झुकलो असतो तर तुरुंगात जावे लागले नसते : लालू प्रसाद यादव

भाजपसमोर झुकलो असतो तर तुरुंगात जावे लागले नसते : लालू प्रसाद यादव

एकमत ऑनलाईन

पाटणा : बिहारच्या पाटणा येथे आयोजित एका कार्यक्रमात आरजेडी नेते आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांनी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मी भाजप आणि मोदींपुढे नतमस्तक झालो असतो तर मला इतके दिवस तुरुंगात राहावे लागले नसते, असा टोला त्यांनी लगावला.

लालू प्रसाद यादव यांनी प्रसार माध्यमांच्या भूमिकेचाही समाचार घेतला. माध्यमं आता मोदींचे हस्तक झाले आहेत. माध्यमांकडून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा दाखवली जात आहे. यासोबतच भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले की, देशभरातील अनेक पक्षांनी दंगलखोर पक्षाशी तडजोड केली, पण मी झुकलो नाही आणि झुकणारही नाही, असं लालू यांनी ठणकावून सांगितले.

लालू पुढे म्हणाले, मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो असतो तर कदाचित इतके दिवस मला तुरुंगात राहावे लागले नसते. भाजप हा देशाचा शत्रू आहे. मी त्यांच्यासोबत कधीही जाणार नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणूकसंदर्भात विचलेल्या प्रश्नावर लालू म्हणाले की, आपण लवकरच नितीश कुमार यांच्यासोबत दिल्लीला जाऊन काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या