36.4 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeराष्ट्रीयहज यात्रा रद्द

हज यात्रा रद्द

- भरलेली रक्कम मिळणार परत

एकमत ऑनलाईन

नगर: सौदी प्रशासनाकडून कोणतीही सूचना मिळालेली नसल्याने यावर्षीची हज यात्रा रद्द करण्यात आली आहे. जुलै-आॅगस्टमध्ये ही यात्रा होणार होती. इतिहासात २२२ वर्षांनंतर ही यात्रा पुन्हा रद्द करावी लागत आहे. यात्रेकरूंनी भरलेली संपूर्ण रक्कम त्यांना परत दिली जाणार असल्याचे केंद्रीय हज समितीकडून घोषित करण्यात आले आहे, अशी माहिती भाजपच्या अल्पसंख्याक आघाडीचे जिल्हाध्यक्ष सलीम बागवान यांनी दिली.

कोरोना संसर्गाचा उद्रेक वाढत असताना १३ मार्च २०२० पासून सौदी प्रशासनाने हज २०२० साठीची तयारी तात्पुरती थांबविली होती. यंदा जुलै-आॅगस्टमध्ये ही यात्रा होती. दरवर्षी हजची तयारी फार आधीपासूनच करावी लागते. त्यानंतर पुढील सूचना येणे अपेक्षित होते. मात्र, अद्याप यात्रेसंबंधी कोणताही सूचना आलेली नसल्याने आता यात्रा रद्द झाल्याचे आपल्या देशातील समितीने घोषित केले आहे.

यात्रा रद्द करण्याचा अर्ज करण्याचे आवाहन
निवड झालेल्या उमेदवारांनी केंद्रीय हज समितीच्या संकेतस्थळावर असलेला यात्रा रद्द करण्याचा फॉर्म भरून तो इ-मेलवर पाठवावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोबत बँक पासबुक किंवा रद्द केलेल्या धनादेशाची फोटोकॉपी जोडावी. त्यानुसार त्यांना पैसे परत करण्यात येणार आहेत. यापूर्वी १७९८ ते १८०१ मध्येही हज यात्रेत खंड पडला होता. त्यानंतर यावर्षी दुसºयांदा कोरोनामुळे २२२ वर्षांनी ती रद्द करण्यात आली आहे. हजपेक्षा वेगळी पण मक्का मदिनेतच होणारी उमरा ही यात्रादेखील सौदी सरकारने फेब्रुवारीत रद्द केली होती.

Read More  हज यात्रा रद्द करु इच्छिणाऱ्या उमेदवारांनी हज समितीला संपर्क साधण्याचे आवाहन

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या