गांधीनगर : पक्षश्रेष्ठींवर नाराज होऊन काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला. काँग्रेसला रामराम ठोकल्यावर ते भाजपामध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधान आले होते.
अखेर त्या चर्चा ख-या ठरल्या. गुजरातमधील गांधीनगर येथील भाजपाच्या मुख्यालयात त्यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी त्यांना पक्षाचे सदस्यत्व दिले. यावेळी गुजरातचे माजी उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांच्यासह भाजपाचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.