26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयहार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण

हार्दिक पटेल यांची काँग्रेसला सोडचिठ्ठी; भाजपप्रवेशाच्या चर्चांना उधाण

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : गुजरातच्या विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधीच काँग्रेस नेते हार्दिक पटेल आणि पक्ष श्रेष्ठींमधील मतभेद समोर आले होते. गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष हार्दिक पटेल यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून कॉंग्रेस पक्षाचे नाव काढून टाकले होते. यानंतर पटेल पक्ष सोडणार का, याकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अखेर निवडणुकीआधी त्यांनी काँग्रेसला रामराम केला आहे. यासंदर्भात त्यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहिले आहे.

‘आज मी धैर्याने काँग्रेस पक्षाच्या पदाचा आणि पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. मला खात्री आहे की माझ्या निर्णयाचे माझे सर्व सहकारी आणि गुजरातचे लोक स्वागत करतील. मला विश्वास आहे की माझ्या या पाुलानंतर भविष्यात गुजरातसाठी खरोखर सकारात्मक काम करू शकेन,’ असं ट्वीट हार्दिक पटेलने केलं आहे.

हार्दिक पटेल यांनी काही दिवसांपूर्वी भाजपच्या कामाची स्तुती करत काँग्रेस पक्षावर सार्वजनिक टीका केली होती. पटेल हे मागील काही दिवसांपासून कॉंग्रेस च्या नेतृ्त्वाबद्दल नाराजी व्यक्त करत होते. या दरम्यान वर्षाच्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत, त्यामुळे आता पटेल यांची नाराजगी काँग्रेसला महाग पडू शकते.

हार्दिक काँग्रेसचा हात सोडणार असल्याच्या चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहेत. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हार्दिकने अयोध्येतील राम मंदिर आणि काश्मिरमधून कलम ३७० हटवल्याचा उल्लेख करत भाजपचे कौतुक केले होते. त्यानंतर आता राजीनामा देत पटेल यांनी नवा राजकीय मार्ग शोधला आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या