22.7 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeराष्ट्रीयहार्दिक पटेल ‘आप’च्या मार्गावर?

हार्दिक पटेल ‘आप’च्या मार्गावर?

एकमत ऑनलाईन

अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. यातच पाच राज्यांत पराभूत झालेल्या काँग्रेसला अलीकडेच मोठा धक्का बसला आहे. काही महिन्यांपूर्वी पक्षात आलेले पाटीदार नेते हार्दिक पटेल यांनी काँग्रेसवर टीका केली होती.

हार्दिक पटेल यांनी अरविंद केजरीवाल हे आवडते नेते आहेत. यावरून हार्दिक पटेल हे आम आदमी पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. काँग्रेसमध्ये काम करण्याची संधीच मिळाली नाही. माझ्या म्हणण्याची दखल घेतली गेली नाही, अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखवली. दरम्यान, आता हार्दिक पटेल भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे. शक्ति सिंह गोयल हे माझ्या वडिलांच्या मृत्यूनंतर घरी आले होते. इतकेच नव्हे तर प्रदेशमधील कोणताही बडा नेता आला नाही. सांत्वन केले नाही, अशी खंत हार्दिक पटेल यांनी बोलून दाखविली. अरविंद केजरीवाल चांगले आहेत कारण निदान ते मॉडेल बनवून देशात आपले स्थान निर्माण करत आहेत. आम आदमी पक्षाचा द्वेष करत नाही, पण जेव्हा गुजरातच्या प्रतिष्ठेचा आणि सन्मानाचा प्रश्न येतो तेव्हा गुजरातच्या अभिमानाच्या पाठीशी उभा राहीन, असे हार्दिक पटेल यांनी म्हटले आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या