27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeराष्ट्रीयहरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाची लागण

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोनाची लागण

एकमत ऑनलाईन

हरियाणा : देशभरात कोरोनाचा प्रसार वाढताना दिसतोय. देशातील अनेक नेते मंडळींना देखील कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. यामध्येच आता हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांना कोरोना झाला आहे.

मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी स्वतः आपल्याला कोरोनाची लागण झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. यापूर्वी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान तसंच कर्नाटकचे मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनाही कोरोनाची लागण झाली होती.

मनोहरलाल खट्टर त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, ‘मी माझी कोरोना चाचणी करून घेतली. चाचणीचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यामुळे ज्या व्यक्ती गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आल्या होत्या त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. त्याप्रमाणे अधिक जवळचा संपर्क असलेल्या व्यक्तींनी क्वारंटाईन व्हावं.’

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात आज सकाळी कोरोनाबाधितांची संख्या 31,06,348 वर पोहोचली आहे. तर रविवारी सकाळी 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 8 वाजेपर्यंत कोरोनाचे 61,408 नवे रूग्ण समोर आले आहेत.

गुगल पे प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने आरबीआय आणि केंद्र सरकारला बजावली नोटीस

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या