हाथरस : हाथरस सामूहिक बलात्काराप्रकरणी गुरुवारी अडीच वर्षांनंतर एससी-एसटी न्यायालयाने फैसला सुनावला. कोर्टाने ४ आरोपींपैकी केवळ एक आरोपी संदीप ठाकूर दोषी घोषित केले आहे, तर लवकूश सिंह, रामू सिंह व रवी सिंह या ३ आरोपींची निर्दोष सुटका केली.
न्यायालयाने संदीपला सदोष मनुष्यवध कायद्यांतर्गत दोषी ठरवले आणि जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ४ आरोपींपैकी कोणत्याही आरोपीवर गँगरेपचा आरोप सिद्ध झाला नाही. त्यामुळे यातील तिघांची निर्दोष मुक्तता झाली.