लुधियाना : तामिळनाडू सध्या बिहारी मजुरांच्या पलायनामुळे चर्चेत आले आहे. पण आता एक अशी आगळीवेगळी घटना उजेडात आली आहे. बिहारचा हा मुलगा मुलीचा पिच्छा सोडवण्यासाठी प्रथम लुधियानाला पळून गेला.
पण मुलीने लुधियानातील त्याच्या भावाचे घर गाठून त्याला परत आणले. तेथून तो पुन्हा वाराणसीला पळून गेला. मुलीने तेथूनही त्याला शोधून काढले. विशेष म्हणजे हा मुलगा तेथून पुन्हा रेल्वेने पळून गेला. आश्चर्य म्हणजे त्यानंतरही मुलीने त्याचा पाठलाग सोडला नाही. त्यामुळे त्याने थेट धावत्या रेल्वेतून उडी मारली. त्याचे हात-पाय मोडले. मुलीने त्याला घरी आणले. त्यानंतरही हा मुलगा अचानक पळून गेला. अखेरीस मुलीने पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर पोलिसांनी त्या दोघांचे लग्न लावून दिले.