25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeराष्ट्रीय‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’; केंद्रीय माहिती आयोगच अनभिज्ञ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : कोरोनाचा शिरकाव झाल्यापासून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केंद्र सरकारकडून तयार करण्यात आलेल्या आरोग्य सेतू ऍपचा वापर करण्याचे आवाहन केले जात आहे. प्रवासासह अनेक ठिकाणी हे ऍप सक्तीचे करण्यात आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही या ऍपचे कौतुक केले आहे. मात्र, या ऍपबद्दल केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालय, राष्ट्रीय माहिती केंद्र यांनी हे ऍप कुणी तायर केले. याविषयी काहीही माहिती नसल्याचे उत्तर दिले आहे. माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या माहितीवर हे अजब उत्तर देण्यात आले असून, केंद्रीय माहिती आयोगाने यावरून फैलावर घेतले आहे.

केंद्रीय माहिती आयोगाने (सीआयसी) मंगळवारी केंद्रीय माहिती तंत्रज्ञान मंत्रालयातील केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिकारी (सीपीआयओ), राष्ट्रीय माहिती केंद्र (एनआयसी) व एनईजीडी यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आरटीआयच्या अधिनियमांनुसार कलम २० अंतर्गत गुन्हा का दाखल केला जावू नये? असा सवाल केला आहे. या सर्वांवर आरोग्य सेतु ऍप संबंधित आरटीआयला प्रतिसाद आणि उत्तर न दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आरोग्य सेतूच्या वेबसाइटवर हे ऍप एनआयसीच्या प्लॅटफॉर्मवर डिझाईन, डेव्हलप आणि होस्ट करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र, एनआयसीला यासंदर्भात माहिती कशी नाही, असा सवाल केंद्रीय माहिती आयोगाने केला आहे. केंद्रीय माहिती आयोगाचे मुख्य आयुक्त एन. सरण यांनी यासंदर्भात लेखी उत्तर मागितले आहे. तसेच त्यांच्याकडे काही माहिती नसल्यास आरोग्य सेतू हे अ‍ॅप गोव्हरमेंट.इनवर या नावाने वेबसाइट कशी तयार केली गेली, असा सवाल करत त्यांनी संबंधित अधिका-यांना फैलावर घेतले. कोणत्याही केंद्रीय सार्वजनिक माहिती अधिका-याने हे ऍप कोणी तयार केले, फाइल्स कोठे आहेत. याबद्दल माहिती दिलेली नाही.

अ‍ॅपबाबत याचिका दाखल
ऍप तयार करण्याबाबत एनआयसीकडे माहिती नाही असे याचिकेत सांगण्यात आले आहे, असे एन. सरण यांनी सांगितले. जर तुम्ही हे ऍप बनवले असेल, तर हे उत्तर आश्चर्यकारक आहे, अशा शब्दात सरण यांनी कानउघडणी केली आहे.

संबंधीत विभागही माहितीपासून वंचित
लाईव्ह लॉने दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय माहिती आयोगाने सौरव दास यांच्या तक्रारीनंतर हे आदेश दिले आहेत. या प्रकरणात एनआयसी, नॅशनल ई-गव्हर्नन्स विभाग (एनजीडी) आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने आरोग्य सेतु ऍप आणि त्याच्या निर्मितीशी संबंधित अन्य प्रक्रियेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही.

कोरोनामुळे मानसिक स्थिती खालावतेय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या