24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeराष्ट्रीयभ्रष्टाचाराचा आरोप, आरोग्य मंत्र्याला अटक

भ्रष्टाचाराचा आरोप, आरोग्य मंत्र्याला अटक

एकमत ऑनलाईन

चंदीगड : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी आप सरकारमधील आरोग्यमंत्री डॉ. विजय सिंगला यांची भ्रष्टाचाराच्या आरोपावरून हकालपट्टी केली. पंजाब पोलिसांच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखेकडून त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकही करण्यात आली आहे. सगळ््यात महत्त्वाचे म्हणजे पंजाबचे आरोग्यमंत्री असताना विजय सिंगला यांनी २३ मार्च रोजी भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याची घोषणा केली होती. त्यांच्या या विधानानंतर ६२ दिवसांनी ते भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकले. त्यांनी आरोग्य विभागातील प्रत्येक कामासाठी आणि निविदांसाठी १ टक्के कमिशन मागितल्याचा आरोप आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या