28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयउत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे

उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे

एकमत ऑनलाईन

लखनऊ: उत्तर प्रदेशात सध्या कोरोनाच्या दुस-या लाटेचा कहर बराचसा मंदावला आहे. मात्र मृत्यूंची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. राज्यातील आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण आल्याचे जाणवत आहे. कोरोना प्रतिबंधक लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड आदी सर्व बाबींचा तुटवडा जाणवत आहे. त्यावरुन अलाहाबाद उच्च न्यायालयाने योगी सरकारला खडे बोल सुनावले आहेत. एवढेच नव्हे तर उत्तर प्रदेशमधील आरोग्य व्यवस्था राम भरोसे असल्याचे स्पष्ट मत न्यायालयाने नोंदवले आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने योगी सरकारला धारेवर धरले. न्या. अजित कुमार आणि न्या. सिद्धार्थ वर्मा यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने योगी सरकारला पाच सूचना केल्या आहेत.

न्यायालयाने दिलेल्या ५ सूचना
मोठ्या औद्योगिक घराण्यांकडून करण्यात येणा-या दानाची रक्कम वा फंड कोरोनाची लस खरेदीसाठी वापरावा. बीएचयू वाराणसीसह गोरखपूर, प्रयागराज, आग्रा, मेरठ येथील ४ मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयातील सुविधा वाढवाव्यात. २२ मेपर्यंत याचा अपग्रेडेशन प्लान न्यायालयाला सादर करावा, आदी सुचना न्यायालयाने केल्या आहेत. छोट्या शहरात २० रुग्णवाहिका, प्रत्येक गावात आयसीयू सुविधा असलेल्या २ रुग्णवाहिका तैनात कराव्यात. नर्सिंग होमच्या सुविधा वाढवा. तेथील बेडचे वर्गीकरण करावे. ३० बेड असणा-या नर्सिंग होममध्ये ऑक्सिजन उत्पादन करणा-या प्रकल्पाची उभारणी करावी, अशा ५ सूचनावजा सल्ले न्यायालयाने योगी सरकारला दिले आहेत.

नारदा प्रकरणी तृणमुलच्या ४ नेत्यांचा जामीन रद्द

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या