नवी दिल्ली : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पोलीस आणि हॉस्पिटल यांच्याकडून अपघात झाल्यानंतर घटनास्थळी मदत करणार्या लोकांचे नाव, पत्ता, ओळख, दूरध्वनी क्रमांक किंवा इतर पर्सनल डिटेल्स देण्यास भाग पाडले जाणार नाही. जर आपल्याला सोप्या भाषेत समजून घायचे असेल तर आता आपण कोणत्याही भीतीशिवाय एखादी दुर्घटना आणि रस्ते अपघातातील पीडितांना मदत करू शकता.
मदत करणाऱ्याला वाटले तरच तो आपले डिटेल्स अधिकाऱ्यांसह शेअर करू शकेल
या नवीन नियमांनुसार आता लोकांना मदत करणार्या चांगल्या नागरिकांना सन्मानपूर्वक वागवले जाईल. तसेच, यात हे देखील स्पष्ट केले गेले आहे की, जर मदत करणाऱ्याला स्वत: ला वाटत असेल तरच तो अधिकाऱ्यांना आपले पर्सनल डिटेल्स देऊ शकेल.
साक्षीदार बनण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तीची नवीन कायद्यानुसार चौकशी केली जाईल
केंद्र सरकारने जारी केलेल्या नवीन नियमांमध्ये अपघात झाल्यास एखादी व्यक्ती साक्षीदार बनण्यास तयार असेल तर नव्या कायद्यातील तरतुदींनुसारच त्याची चौकशी केली पाहिजे. पीडित व्यक्तीस मदत करणार्याला पीडिताला झालेल्या कोणत्याही दुखापतीसाठी किंवा मृत्यूसाठी जबाबदार धरले जाणार नाही. त्याच्याविरोधात कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी खटला दाखल होऊ शकणार नाही.