28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeराष्ट्रीयहेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

हेमंत बिस्वा शर्मा आसामचे नवे मुख्यमंत्री

एकमत ऑनलाईन

गुवाहाटी : विधानसभा निवडणुकीत सलग दुस-यांदा विजय मिळवत भाजपाने आसाममधील सत्तेत घरवापसी केली. आसाममध्ये भाजपा सत्ता स्थापन करत असल्याचे निकालाच्या दिवशीच स्पष्ट झाले होते. मात्र, नवीन सरकार कुणाच्या नेतृत्वाखाली असेल, याबद्दल बरीच चर्चा सुरू होती. माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांना कायम करणार की, हेमंत बिस्वा शर्मा यांना संधी मिळणार? अखेर हे चित्र रविवार दि़ ९ मे रोजी स्पष्ट झाले. सोनावाल यांना बाजूला सारत हेमंत बिस्वा शर्मा यांनी बाजी मारली आहे.

आसाम विधानसभा निवडणुकीत भाजपाने काँग्रेसचा पराभव करत निवडणुकीत विजय मिळवला. मात्र, ही निवडणूक लढवत असताना भाजपाने मुख्यमंत्री पदाच्या उमेदवाराबद्दल कोणतीही वाच्यता केली नव्हती. त्यामुळे तत्कालिन मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल आणि आसाम भाजपातील वजनदार नेते हेमंत बिस्वा शर्मा यांच्या नावाभोवतीच चर्चा सुरू होती. काल (८ मे) दिल्लीत बैठक झाल्यानंतरही कोणतीही वाच्यता करण्यात आली नव्हती.

सोनोवाल पुन्हा केंद्रात जाणार?
भाजपाने आसाममध्ये खांदेपालट करण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्रीपदी हेमंत बिस्वा शर्मा यांची निवड करण्यात आल्यानंतर आता सर्वानंद सोनोवाल यांचं काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सोनोवाल यांना पुन्हा दिल्लीत बोलवले जाणार असल्याची चर्चा सुरू आहे. आसामचे मुख्यमंत्री होण्यापूर्वी सोनोवाल हे केंद्रात मंत्री होते. नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या पाच वर्षाच्या कार्यकाळात सोनोवाल क्रीडा मंत्री होते.

राज्यात विक्रमी रुग्णांनी केली कोरोनावर मात

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या