24.2 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeराष्ट्रीयहिजबुलचा कमांडर तालिब हुसैन अटकेत

हिजबुलचा कमांडर तालिब हुसैन अटकेत

एकमत ऑनलाईन

बंगळुरू : जम्मू-काश्मीर पोलिसांनी हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर तालिब हुसैनला बंगळुरू येथून जिवंत अटक केली. दहशतवाद्यांच्या ए-यादीत त्याचा समावेश होता. १७ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या संयुक्त कारवाईत हे यश मिळाले.

हिजबुल मुजाहिद्दीनने किश्तवाड भागात नव्याने भरती करून आपल्या कॅडरची पुनर्रचना आणि बळकटीकरण करण्यास सुरुवात केली होती. डीजीपी दिलबाग सिंह यांनी सांगितले की, तालिब किश्तवाडमध्ये बराच काळ सक्रिय होता. तो बंगळुरूमध्ये लपला होता आणि तेथून दहशतवादी कारवाया करत होता. तेथे पोहोचल्यानंतर पथकाने तालिबचा माग काढला. त्याच्या अटकेने किश्तवाडमधील दहशतवादी घटना कमी होतील.

नुकत्याच झालेल्या टार्गेट किलिंगबाबत डीजीपी सिंह यांनी सध्या वातावरण शांत आहे. वर्षाच्या ५ महिन्यांत निवडक हत्यांमध्ये सहभागी असलेले ४७ जण पकडले गेले, असे सांगितले. ५ मुलांचा बाप असलेला तालिब गुर्जर हिजबुलमध्ये सामील झाल्यानंतर अनेकदा किश्तवाड जिल्ह्यातील मारवाह आणि दाछनच्या वरच्या भागात शस्त्रांसह फिरताना दिसत होता. यासोबतच या भागात सक्रिय असलेले आणखी काही दहशतवादीही दिसले.

२०१६ पासून तालिब निशाण्यावर होता
जम्मूमधील किश्तवाड हा एकमेव जिल्हा आहे. जिथे हिजबुल दहशतवाद्यांच्या कारवाया रोजच चर्चेत असतात. तालिब हुसैन हा सर्वात जास्त काळ जगलेला दहशतवादी आहे. २०१६ पासून तो दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. तालिब गुर्जर हा स्थानिक गुर्जर जमातीचा आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या