24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeराष्ट्रीयहिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

हिजबुलच्या टॉप कमांडरचा खात्मा

एकमत ऑनलाईन

श्रीनगर : सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत देशातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणा-या एका मोठया दहशदवाद्याला ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले आहे. उत्तर कश्मीरच्या हंदवाडा येथे चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनच्या अतिरेकी संघटनेचा सर्वात जुना आणि सर्वोच्च कमांडर असलेला मेहराजउद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद याला सुरक्षा दलांनी ठार केले आहे. हा मेहराजउद्दीन अनेक दहशतवादी घटनांमध्ये सामील असल्याची माहिती काश्मीरच्या पोलिस महानिरीक्षकांनी दिली. सुरक्षा दलाचे हे एक मोठे यश असल्याचे असल्याचे त्यांनी म्हटले.

उत्तर काश्मीरच्या हंदवारा येथील क्रालगुंडमधील पाझीपोरा-रेनान भागात सुरक्षा दलाची दहशतवाद्यांशी चकमक झाली. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर हे ऑपरेशन केले गेले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उबाईद २०११ मध्ये दहशतवादी गटात सामील झाला होता.
मारलेला अतिरेकी मेहराजुद्दीन हलवाई उर्फ ​​उबैद २०११ साली दहशतवादी गटात सामील झाला होता. त्याने कॉप्युटर ऍप्लिकेशनमध्ये डिप्लोमादेखील केला होता. सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि दहशतवादी कारवायांसाठी वापरल्या जाणा-या संवादाच्या प्रणालीसाठी जबाबदार होता असे काश्मीर झोन पोलिसांनी ट्वीट केले आहे.

तरुणांची करीत होता भरती
जम्मू-काश्मीर पोलिसांच्या नोंदींनुसार मेहराजुद्दीन हलवाई हा अ ++ वर्गीकृत दहशतवादी होता. तो दहशतवादी गटात तरुणांची भरती करत होता. चकमकीच्या ठिकाणाहून बेकायदेशीर साहित्य, शस्त्रे आणि दारूगोळे, औषधे जप्त केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ममता बॅनर्जींना हायकोर्टाकडून मोठा धक्का

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या