24 C
Latur
Sunday, September 25, 2022
Homeराष्ट्रीयउच्चांकी १ लाख रुग्ण कोरोनामुक्त ; रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

उच्चांकी १ लाख रुग्ण कोरोनामुक्त ; रुग्ण बरे होण्याच्या टक्केवारीत वाढ

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत उच्चांक नोंद झाल्याचे पाहायला मिळाले होते. परंतु गेल्या २४ तासांत नव्या रुग्णांच्या संख्येतही घट झाली आहे, तर दुसरीकडे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांच्या संख्येनेही उच्चांक गाठला आहे. गेल्या २४ तासांत देशात १ लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर दुसरीकडे सतत ९० हजारांच्या वर वाढणारी रुग्णसंख्याही आता कमी होऊन ती ७५ हजारांवर आली आहे.

देशातील कोरोनाविरोधातील लढ्याला यश मिळताना दिसत असून, गेल्या २४ तासांत एक लाखांपेक्षा अधिक रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने देशातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या ४४ लाख ९७ हजार ८६७ वर पोहोचली आहे. दुसरीकडे देशातील रिकव्हरी रेट अर्थात रुग्ण बरे होण्याचा दरही वाढला असून तो ८०.८६ टक्क्यांवर पोहोचला असल्याचे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.

देशात ९ लाखांवर अ‍ॅक्टिव्ह केसेस
मागील २४ तासांत देशात ७५ हजार ८३ नवे कोरोनाबाधित आढळले असून, १ हजार ५३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांची एकूण संख्या ५५ लाख ६२ हजार ६६४ वर पोहोचली असून, देशात ९ लाख ७५ हजार ८६१ अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. आतापर्यंत एकूण ८८ हजार ९३५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

राज्यातही २० हजार रुग्णांची कोरोनावर मात
महाराष्ट्रात १८ हजार ३९० नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे आतापर्यंतची राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या १२ लाख ४२ हजार ७७० इतकी झाली आहे. मागील २४ तासांत २० हजार २०६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. या संख्येमुळे आतापर्यंत ९ लाख ३६ हजार ५५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्याच्या घडीला राज्यात २ लाख ७२ हजार ४१० अ‍ॅक्टिव्ह केसेस आहेत. मागील २४ तासांत ३९२ मृत्यू झाले आहेत. या संख्येमुळे राज्यातील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची एकूण संख्या ३३ हजार ४०७ इतकी झाली आहे. दरम्यान, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ७५.३६ टक्के इतका झाला आहे. आजवर तपासण्यात आलेल्या ६० लाख १७ हजार २८४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १२ लाख ४२ ७७० नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १८ लाख ७० हजार २०० व्यक्ती होम क्वारंटाइन आहेत, तर ३४ हजार ९८२ व्यक्ती संस्थात्मक क्वारंंटाइन आहेत.

किल्लारी, मारुती महाराज हे दोन्ही कारखाने सुरूकरा

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या