25.2 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeराष्ट्रीयदेशांत मृतकांचा उच्चांक; २४ तासांत १३४१ मृत्यू

देशांत मृतकांचा उच्चांक; २४ तासांत १३४१ मृत्यू

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुस-या लाटेचा उद्रेक झाला असून, सलग तिस-या दिवशी दोन लाखांहून जास्त नवीन रुग्ण सापडले आहेत. पहिल्या लाटेतही देशात इतके रुग्ण सापडले नव्हते. गेल्या २४ तासांत भारतात तब्बल २ लाख ३४ हजार ६९२ नवीन रुग्णांची नोंद झाली. तर दिवसभरात १ लाख २३ हजार ३५४ रोग कोरोनामुक्त झाले.

शुक्रवारी १ हजार ३४१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. आतापर्यंत एका दिवसात ही सर्वाधिक मृत्यू झाल्याची संख्या आहे. गेल्या वर्षी १५ सप्टेंबरला एका दिवसात सर्वाधिक १२९० मृत्यू झाले होते. याआधी गुरुवारीसुद्धा देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या २ लाखांपेक्षा जास्त होती. देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० जण कोरोनामुक्त झाले आहेत.

सध्या देशात सक्रीय रुग्णांची संख्या ही १६ लाख ७९ हजार ७४० असून आतापर्यंत कोरोनामुळे १ लाख ७५ हजार ६४९ जणांना प्राण गमवावे लागले आहेत. देशात लसीकरण मोहिम सुरु आहेत. आतापर्यंत जवळपास १३ लाख डोस देण्यात आले आहेत.

लालू प्रसाद यादव यांना जामीन मंजूर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या