22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयमहामार्ग टोलमुक्त होणार

महामार्ग टोलमुक्त होणार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : देशभरातील महामार्गावर गर्दीचे कारण ठरणारे टोलनाके आता बंद करण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच टोल प्लाझावरील जॅमपासून लोकांची सुटका होणार आहे. फास्टॅगच्या सहाय्याने टोलनाक्यावरील वाहतूक गतिमान करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, तो फारसा यशस्वी होताना दिसत नाही. परिणामी आता जीपीएस आधारित टोलवसुलीच्या मदतीने टोलनाके हटवले जाणार आहेत.

जीपीएस आधारित टोल प्रणालीसाठी मोटार वाहन कायद्यातही काही बदल करावे लागतील, असे या प्रकरणातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. हा आराखडा रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या सहकार्याने तयार केला जात आहे. जीपीएस आधारित टोलचे तंत्रज्ञान भारतात असून ते फार कमी वेळात सुरूही केले जाऊ शकते. मात्र, ग्रीनफिल्ड एक्स्प्रेसवे आणि महामार्गांनाच प्राधान्य दिले जाईल, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

या तंत्रज्ञानाच्या अंतर्गत तुम्हाला तुमच्या कारमध्ये जीपीएस डिव्हाईस फिक्स करावे लागेल. तुम्ही टोल असलेल्या महामार्गावर वाहन आणताच टोलची गणना सुरू होईल आणि त्या रस्त्यावर तुम्ही प्रवास केलेल्या अंतरानुसार पैसे कापले जातील. ही रक्कम थेट तुमच्या बँक खात्यातून कापली जाईल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या बँक खात्याची माहितीही सरकारला द्यावी लागेल. तसेच या प्रणाली अंतर्गत तुम्हाला तुमच्या वाहनाची नोंदणी करावी लागेल. जीपीएस आधारित टोल प्रणालीच्या मदतीने स्थानिक लोकांना टोलवर मिळणारी सवलत बंद होऊ शकते, असेही सांगितले जात आहे.

प्रवासानुसार शुल्क
जीपीएस आधारित टोल प्रणाली कार्यान्वित झाल्यास लोकांना फिक्स्ड शुल्क भरावे लागणार नाही, तर त्यांनी जेवढा प्रवास केला, तेवढीच रक्कम भरावी लागेल. त्यामुळे टोलनाक्यांजवळील जामच्या समस्येपासूनही सुटका होणार आहे. यासोबतच टोल प्लाझावर दररोज होणा-या वादाच्या घटनाही संपणार आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या