24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeराष्ट्रीयजगात सर्वांधिक बोलली जाणारी हिंदी तिसरी भाषा

जगात सर्वांधिक बोलली जाणारी हिंदी तिसरी भाषा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : हिंदी भाषेचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १४ सप्टेंबर रोजी हिंदी दिवस साजरा केला जातो आणि त्याच दिवशी ती भारताच्या अधिकृत भाषांपैकी एक म्हणून घोषित करण्यात आली. व्यापकपणे बोलली जाणारी जगातील तिस-या क्रमांकाची भाषा म्हणून हिंदीकडे पाहीले जाते. या भाषेबद्दल अनेक मनोरंजक तथ्ये आहेत. हिंदीला अनेक उपनावे आहेत. कवी तुलसीदास हिंदीला भाखा म्हणायचे तर मलिक मुहम्मद जयासी हिंदवी म्हणत असत.

भारताच्या स्वातंत्र्यानंतर १४ सप्टेंबर १९४९ रोजी संविधान सभेने एकमताने निर्णय घेतला की हिंदी भाषा ही भारताची अधिकृत भाषा असेल. राष्ट्रभाषा प्रचार समिती, वर्धा यांच्या विनंतीनुसार, या महत्त्वाच्या निर्णयाचे महत्त्व दर्शविण्यासाठी आणि प्रत्येक प्रदेशात हिंदीचा प्रसार करण्यासाठी, १४ सप्टेंबर १९५३ पासून दरवर्षी संपूर्ण भारतात हिंदी दिवस म्हणून साजरा केला जात होता.ंिहदी वरवर पाहीले तर सोपी वाटते. पण, त्यातील काही शब्द आणि त्यांचे अर्थ भलतेच अवघड आहेत. आज हिंदी भाषा दिन आहे. जगात हिंदी भाषेचे वर्चस्व वेगात वाढत आहे. १९०० ते २०२१ या १२१ वर्षांच्या काळात हिंदीच्या प्रसाराचा वेग १७५.५२ टक्क्यांनी वाढला आहे. इंग्रजीचा वेग ३८०.७१ टक्के आहे. त्यानंतर सर्वात वेगात प्रसार होणारी भाषा हिंदी आहे. सध्या जगात इंग्रजी आणि मंदारिन या भाषांनंतर हिंदी तिस-या क्रमांकाची भाषा आहे.

आधी १९ व्या शतकात जागात सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांमध्ये हिंदी चौथ्या स्थानावर होती. स्टॅटेस्टिकनुसार त्यावेळी मंदारिन, स्पॅनिश आणि इंग्रजी या अनुक्रमे पहिल्या तीन भाषा होत्या. जसजसा देश प्रगती करत आहे तशी भारतीय भाषांची विशेषत: हिंदीची पोहच वाढली आहे. ब-याच कालावधीनंतर १९६१ मध्ये हिंदी भाषेने स्पॅनिश भाषेला मागे टाकत जगातील सर्वाधिक बोलल्या जाणा-या भाषांच्या यादीत तिस-या क्रमांकाचे स्थान पटकावले. आता जगभरात ४२.७ कोटी लोक हिंदी बोलतात. त्यात वाढ होत २०२१ मध्ये ६४.६ कोटीवर पोहचली. ही संख्या ज्यांची मातृभाषा हिंदी अशा ५३ कोटी लोकांशिवाय आहे.

भारतात ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी
देशात ४३.६३ टक्के म्हणजेच ५३ कोटी लोकांची मातृभाषा हिंदी आहे. १३.९ कोटी म्हणजेत ११ टक्के लोकांची ही दुस-या क्रमांकाने सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. जगात ६४.६ कोटी लोक हिंदी भाषिक आहेत.

गूगलवर १० लाख कोटी पाने हिंदीत आहेत.
गूगलवर सात वर्षात हिंदी भाषेतील माहिती ९४ टक्क्याने वाढते. याचे १० लाख कोटी पाने हिंदीत उपल्ब्ध आहेत.

सर्वाधिक वाचल्या जाणा-या वृत्तपत्रांमध्ये ६ हिंदी
– भारताबाहेर २६० हून अधिक विश्वविद्यालयांत हिंदी शिकवली जाते.
– परदेशात २८ हजारपेक्षा जास्त शिक्षण संस्था हिंदी शिकवत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या