26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeराष्ट्रीयदिल्लीतील जामा मशिदीबाबत हिंदू महासभेचा दावा

दिल्लीतील जामा मशिदीबाबत हिंदू महासभेचा दावा

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली: वाराणसीतील काशी विश्वेश्वर मंदिराशेजारी उभ्या असलेल्या ज्ञानवापी मशिदीच्या सर्वेक्षणावरुन वातावरण तापले असताना आता दिल्लीतील जामा मशिदीवरुन हिंदू महासभेने एक दावा केला आहे. वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीतील विहिरीत शिवल्ािंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला आहे.

हा वाद ताजा असतानाच आता हिंदू महासभेने दिल्लीतील जामा मशिदीच्या पाय-यांखाली हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत, असा दावा केला आहे. इतकेच नव्हे तर, हिंदू महासभेने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले आहे.

हिंदू महासभेचे अध्यक्ष स्वामी चक्रपाणी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी जामा मशिदीचे सर्वेक्षण करण्याची मागणी केली आहे. तसंच, मशिदीच्या पाय-यांखाली हिंदू देवी-देवतांच्या मूर्ती पुरल्या आहेत. त्यामुळे या जागेचे खोदकाम करुन त्या मूर्ती बाहेर काढण्यात याव्यात, असेही या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

हिंदू महासभेने पत्रात इतिहासातील घटनांचा उल्लेख केला आहे. औरंगजेबच्या दरबारातील इतिहासकार शाही मुस्ताक यांनी १७१० मध्ये लिहिलेल्या पुस्तकात या घटनेचा उल्लेख केला होता. खानजहां बहादुरने जोधपूरमधील हिंदू मंदिरांमध्ये लूटमार केली. शेकडो वाहनांमध्ये ती संपत्ती भरुन तो औरंगजेब समोर आला. त्यावेळी औरंगजेब त्याच्यावर खुश होऊन त्यातील मौल्यवान वस्तु आपल्या तिजोरीत ठेवण्याचे आदेश दिले. तसेच, हिंदू देवी- देवतांच्या मूर्ती दिल्लीतील जामा मशिदीच्या पाय-यांखाली पुरुन टाकण्याचे आदेश दिले, असे या पत्रात म्हटले आहे.

मशिदीच्या पाय-यांखाली पुरलेल्या देवी- देवतांच्या मूर्ती बाहेर काढण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावे, जेणेकरुन त्या मूर्तींची पुजा करु शकतो, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या