37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeराष्ट्रीयमाहेरच्यांना संपत्तीचा वारस नेमण्याचा हिंदू महिलांना अधिकार

माहेरच्यांना संपत्तीचा वारस नेमण्याचा हिंदू महिलांना अधिकार

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : महिलेच्या माहेरचे नातेवाईकही तिच्या कुटुंबाचाच एक भाग आहे, यावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. वारसाहक्कासंबंधी एका प्रकरणाची सुनावणी करताना न्यायालयाने हा महत्वपूर्ण निकाल दिला. कुठल्याही विधवा महिलेने तिची हक्काची संपत्ती तिच्या माहेरच्या नातेवाईकांच्या नावे करण्यात कुठलेही गैर नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निकालानुसार, हिंदू वारसा अधिनियम कलम १५ (१) (डी) अन्वये महिलेच्या वडिलांच्या उत्तराधिकाºयांनाही महिलेच्या संपत्तीचा वारस म्हणून सहभागी करून घेतले जावू शकते. हिंदू विवाहितेच्या माहेरच्या वारसाला ‘अनोळखी’ किंवा ‘गैर’ म्हटले जावू शकत नाही तसेच विवाहितेच्या माहेरची माणसेही कुटुंबातील सदस्य मानले जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

एका विधवा महिलेने तिच्या भावाच्या मुलांना वारसाहक्काने संपत्ती देण्याच्या निर्णयाला आव्हान देणारी एक याचिका संबंधित महिलेच्या दिराच्या मुलाकडून न्यायालयात दाखल करण्यात आली होती. कुटुंबाबाहेरील लोकांना संपत्ती देण्याचा निर्णय रद्द केला जावा, अशी मागणी याचिकाकर्त्यांद्वारे करण्यात आली होती. जिल्हा व सत्र न्यायालय तसेच उच्च न्यायालयाने यापूर्वीच याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली होती. कनिष्ठ न्यायालयाकडून देण्यात आलेले निर्णय योग्य असल्याचे सांगत सर्वोच्च न्यायालयानेही याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळली.

गुडगावच्या बाजिदपूर तहसीलच्या गढी गावातील हे प्रकरण आहे. या प्रकरणात गढी गावात बदलू नामक व्यक्तीकडे कृषी जमीन होती. बदलू याला बाली राम आणि शेर सिंह अशी दोन मुले होते. शेर सिंह याचा मृत्यू १९५३ साली झाला. त्याला कोणतेही अपत्य नव्हते. शेर सिंह याच्या मृत्यूनंतर त्याची पत्नी जगनो देवी यांच्या वाट्याला सासºयाची अर्धी जमीन आली होती. जगनो देवी यांनी ही जमीन आपल्या भावाच्या मुलांच्या नावे केली. आत्याकडून मिळालेल्या जमिनीवर दावा करण्यासाठी या मुलांनी न्यायालयात सूट फाईल केला. यावर न्यायालयाने १९ आॅगस्ट १९९१ मध्ये त्यांच्या बाजुने निर्णयही दिला होता. मात्र आता सर्वोच्च न्यायालयाने यावर पडदा पाडला असून, माहेरच्यांना वारसदार बनविणे गैर नसल्याचे म्हटले आहे़

सोशल मीडियासाठी केंद्राच्या नव्या गाईडलाइन्स

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या