32.5 C
Latur
Thursday, February 25, 2021
Home राष्ट्रीय तामिळनाडूत भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड

तामिळनाडूत भाजपकडून हिंदुत्वाचे कार्ड

एकमत ऑनलाईन

चेन्नई : हैद्राबाद महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने हिंदुत्वाचा कार्डवर मुख्य विरोधी पक्ष होण्याइतपत संख्याबळ मिळविले होते. आता तेच हिंदुत्वाचे कार्ड तामिळनाडूतही वापरण्यास भाजपने सुरुवात केली आहे. भाजयुमोचे राष्टÑीय अध्यक्ष तेजस्वी सुर्या यांनी सोमवारी तामिळनाडूचा दौरा करीत सालेम येथे प्रचारसभा घेतली. द्रमुक हा पक्ष हिंदुत्वविरोधी असून तामिळी भाषा वाचवायची असेल तर राज्यात हिंदुत्ववादी सरकार निवडून आणावे लागेल, असा शोध त्यांनी लावला आहे.

तामिळनाडूत द्रमुककडून देशविघातक विचारांचे समर्थन व प्रसार केला जात असल्याचा आरोप सुर्या यांनी केला. तामिळनाडू ही देशातील सर्वाधिक मंदीरे असलेली भूमी आहे. त्यामुळे ती पवित्र असून द्रमुककडून तिच्या पावित्र्याचा भंग केला जात आहे. तामिळ भाषा व अस्मितेचे संरक्षण करण्यासाठी आपल्याला द्रमुकचा पराभव करावाच लागेल, असे त्यांनी सांगितले.

द्रमुकसाठी कुटूंबच पक्ष
द्रमुकमधील घराणेशाहीवरही त्यांनी जोरदार टीकास्त्र सोडले. द्रमुकसाठी परिवार हाच पक्ष असून भाजपकडे त्याच्या उलट पक्ष हाच परिवार अशी भावना असल्याचा निशाणाही सुर्या यांनी साधला. द्रमुकचे नेते सत्तेत नसतात, तेव्हा मंदीरांना भेटी देतात. मात्र सत्ता मिळाल्यावर हिंदू आस्थांवर घाला घालतात, असा आरोपही त्यांनी केला.

रॉबर्ट वाड्रांनी सायकलवरून गाठले कार्यालय

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,433FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या