गांधीनगर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन मोदी यांचा यंदा शंभरावा वाढदिवस असून शनिवारी १८ जून रोजी पंतप्रधान मोदी गुजरात दौ-यासवर आहेत. मोदी आपल्या आईच्या वाढदिवसाला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी या दिवशी आईची भेट घेणार असल्याचीही माहिती मिळाली आहे.
गांधीनंगर येथील घरी हिराबेन यांचा १०० वा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई या आपल्या धाकट्या मुलासोबत गांधीनगर शहराच्या बाहेरील रायसन गावात राहतात. तिथेच त्यांचा वाढदिवस साजरा होणार आहे. तसेच, वाढदिवसानिमित्त वडनगर येथील हाटकेश्वर मंदिरात पूजेचे आयोजनदेखील करण्यात आले आहे. दरम्यान, वाढदिवसानिमित्त हिराबेन मोदी यांना पंतप्रधान मोदींकडून खास गिफ्ट मिळणार आहे. हिराबेन यांच्या शताब्दी वर्षानिमित्त गांधीनगर येथील एका रस्त्याला हिराबेन यांचे नाव दिले जाणार आहे अशी माहिती गांधीनगरच्या महापौरांनी दिली आहे.