21.9 C
Latur
Monday, August 15, 2022
Homeराष्ट्रीयनुपूर शर्मांना फटकारले; १५ न्यायाधिशांचा आक्षेप

नुपूर शर्मांना फटकारले; १५ न्यायाधिशांचा आक्षेप

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात नुपूर शर्माच्या खटल्याची सुनावणी करताना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि जेबी पारडीवाला यांच्या न्यायासनाने याचिकाकर्त्यांना फटकारले, तसेच महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले होते.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायासनाने या प्रकरणी नोंदवलेल्या निरीक्षणावर ११७ दिग्गज व्यक्तींनी आक्षेप नोंदवला आहे. यामध्ये १५ निवृत्त न्यायाधीशांचा देखील समावेश आहे.

देशातील ११७ सेलिब्रेटींनी खुले पत्र प्रसिद्ध करून सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीवर आक्षेप घेतला आहे. या सेलिब्रेटींमध्ये १५ निवृत्त न्यायाधीश, ७७ निवृत्त नोकरशहा आणि २५ निवृत्त सशस्त्र दलाचे अधिकारी यांचा समावेश आहे.

माननीय सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्याच्या मूलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याऐवजी, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला. तसेच याचिकाकर्त्याला याचिका मागे घेण्यास भाग पाडले आणि सुनावणी दुसरीकडे पाठविण्याचे उच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रात येत नसताना योग्य मंचाकडे (उच्च न्यायालय) जाण्यास सांगितले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या