22.1 C
Latur
Friday, August 12, 2022
Homeराष्ट्रीयरुग्णालयाला आग, दहा जणांचा मृत्यू

रुग्णालयाला आग, दहा जणांचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मध्य प्रदेशातील जबलपूर येथील घटना
जबलपूर : मध्य प्रदेशातील जबलपूर येथील एका खासगी रुग्णालयाला भीषण आग लागली. या दुर्घटनेत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जबलपूरचे एसपी सिद्धार्थ बहुगुणा यांनी दिली. मृतांमध्ये बहुतांश रुग्णालयातील कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.

अग्निशमन दलाच्या गाड्यांनी तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली. या घटनेनंतर रुग्णालयात एकच खळबळ उडाली होती. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना इतर रुग्णालयात हलवण्यात आले. तसेच ६ हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

गोहलपूर पोलिस स्टेशन हद्दीतील चांडाल भाटा भागातील न्यू लाईफ मल्टी स्पेशालिटी रुग्णालयात दुपारी अचानक आग लागली. रुग्णालयातून बाहेर येण्याचा एकच मार्ग असल्याने बहुतांश लोक आत अडकले. पाहता पाहता आगीने भीषण रूप धारण केले. सुरुवातीला अग्निशमन दलाच्या गाड्यांनाही आगीवर नियंत्रण मिळवता आले नाही. त्यानंतर वीज विभागाच्या कर्मचा-यांनी वीज जोडणी कापली. तासाभराच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.

मृतांच्या नातेवाईकांना
प्रत्येकी ५ लाखांची मदत
या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाख रुपये आणि गंभीर जखमींना ५० हजार रुपयांची मदत देणार असल्याचे जाहीर केले. जखमींच्या संपूर्ण उपचारासाठी ५० हजार रुपये खर्च येणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या