27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeराष्ट्रीय‘आयएएस’चा प्रताप!  काळा पैसा पांढरा करण्यासाठी उभारले हॉस्पिटल

‘आयएएस’चा प्रताप!  काळा पैसा पांढरा करण्यासाठी उभारले हॉस्पिटल

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) झारखंडच्या ‘आयएएस’ अधिकारी आणि माजी खाण सचिव पूजा सिंघल यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपपत्र दाखल केले आहे. सुमारे ५ हजार पानांच्या या आरोपपत्रात अनेक खुलासे करण्यात आले आहेत. यामध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी वापरलेल्या पद्धतींचा देखील ईडीने आरोपपत्रात उल्लेख केला आहे.

२००० च्या बॅचच्या ‘आयएएस’ अधिकारी पूजा सिंघल यांना मनरेगा निधीच्या अपहार आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार प्रकरणी आधीच अटक करण्यात आली. पूजा सिंघल यांना झारखंड सरकारने अटक केल्यानंतर लगेचच निलंबित केले होते. त्या उद्योग सचिव होत्या. तसेच राज्य खनिकर्म आणि भूविज्ञान विभागाच्या सचिवाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांच्याकडे होता.सिंघल यांच्याव्यतिरिक्त सुमन कुमारलाही अटक करण्यात आलीे. हे दोघेही न्यायालयीन कोठडीत आहेत.

ईडीने ६ मे रोजी सिंघल, त्यांचे पती उद्योजक अभिषेक झा आणि रांची येथील चार्टर्ड अकाउंटंट सुमन कुमार यांच्या घरावर छापा टाकला होता. एजन्सीने दावा केला होता की सुमन कुमार यांच्या निवासस्थानातून आणि कार्यालयाच्या परिसरातून १७.७९ कोटी रुपये रोख जप्त केले होते. या अटकेनंतर ईडीने अनेक राज्य सरकारी अधिका-यांचीही चौकशी केली होती.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या